वसुंधरा मातेने मला भरभरुन दिले आहे-!
वृक्ष आपला श्वास आणि आपल्या भविष्याचा आधार आहे-!
माझ्या सभोवतालचे पशु, पक्षी आणि झाडे हे रक्ताच्या नात्या-सारखे आहेत-!
त्यांच्या-कडून माझ्या गरजांपुरते मी जरुर घेईन-!
परंतु-, अधिक घेण्याचा कदापिही प्रयत्न करणार नाही-!
पाऊस येतो, तो हिरवाईचे स्वप्न घेऊन-!
येत्या ३ वर्षातील पावसाळ्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात मी अंत:करणापासून सहभागी होत आहे-!
राज्य शासनाच्या www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थ्ळावर हरित सेनेच्या सदस्यत्वाची मी नोंद केली आहे-!
आप्तेष्ट आणि इतरांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत करण्याचा निर्धार करतो/करते-!
फळफळावळ, शोभिवंत आणि सावली देणारी झाडे मोठया संख्येने लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन-!
वृक्षरोपणानंतर संरक्षण, पाणी पुरवठा, संगोपन आणि देखभाल इत्यादी जबाबदारी घेण्याची मी शपथ घेतो/घेते-!
वन, वन्यजीव, जैवविविधता, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यांच्याशी संबंधित कार्यक्रमांत भाग घेईल-!
एकंदरीतच वृक्ष क्रांतीची ही मोहीम निरंतरपणे सुरु ठेवण्याचा दृढ संकल्प करतो/करते-!
माझा महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र, जय हिंद !